पदवीधर प्रशिक्षण कार्यक्रम

भारतीय न्यूट्रीनो वेधशाळातील सुविधा वापरून उच्च ऊर्जा भौतिकशास्त्रातील विविध प्रयोग करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षित संशोधक आणि अभियंत्यांची गरज आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ऑगस्ट २००८ पासून उच्च ऊर्जा भौतिकशास्त्रातील प्रयोगावर भर दिलेला प्रशिक्षण उपक्रम राबवायला सुरवात केली गेली आहे. या प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आणि लेखी परीक्षा टाटा मुलभूत संशोधन संस्थेच्या प्रवेशप्रक्रियेबरोबर जोडलेली आहे. अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा. निवड झालेल्या उमेदवारांची होमी भाभा राष्ट्रीय संस्थेत (HBNI: Homi Bhabha National Institute) Ph.D. चे विद्यार्थी म्हणून नोंदणी केली जाते आणि ते टाटा मुलभूत संशोधन संस्था, मुंबई येथे, सैद्धांतिक आणि प्रायोगिक उच्च ऊर्जा भौतिकशास्त्राच्या एका वर्षाच्या अभ्यासक्रमात सहभागी होतात. हा अभ्यासक्रम विशेषत: विद्यार्थ्यांना उत्तम प्रायोगिक भौतिकशास्त्रज्ञ बनविण्यासाठी विकसित केला गेलेला आहे. अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केलेले विद्यार्थी विविध सहकारी संस्थांमधील Ph.D. मार्गदर्शकांच्या हाताखाली संशोधनाला सुरवात करतात.

पात्रता:
अर्जदार भौतिकशास्त्रातून पदव्युत्तर शिक्षण घेतलेला, अथवा अभियांत्रिकी/तंत्रज्ञान शाखांतील लेक्ट्रॉनिक्स, लेक्ट्रॉनिक्स व कम्युनिकेशन, इंस्ट्रुमेंटँशन आणि इलेक्ट्रीकल यापैकी कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. अर्जदाराला भौतिकशास्त्राबद्दल रस व त्यात प्राविण्य असावे. तसेच अर्जदाराने पात्रता पदवी परीक्षेत कमीतकमी ५५% गुण मिळविलेले असावेत.


निवड झालेल्या सर्व उमेदवारांना राहण्याच्या सोयीसुविधेबरोबरच मासिक रुपये १८,००० शिष्यवृत्ती व वार्षिक रुपये २०,००० निधी दिला जातो.

जर तुम्ही अजूनपर्यंत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले नसेल तरीही वेगवेगळ्या अल्पकालीन प्रकल्पांसाठी आमच्याशी निःसंकोचपणे संपर्क साधा. आमच्यात सामील होण्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन करण्यास आम्हाला आनंद वाटेल.

संपर्क:
प्रा. नवकुमार मोंडल, (nkm@tifr.res.in)
मुख्य प्रवक्ते, भारतीय न्यूट्रीनो वेधशाळा,
उच्च ऊर्जा भौतिकशास्त्र विभाग,
टाटा मुलभूत संशोधन संस्था,
होमी भाभा मार्ग, मुंबई ४००० ०५, भारत.