आम्ही काय करीत आहोत

INO चे उदिष्ट

प्रारंभी...
भारतीय न्यूट्रीनो वेधशाळा (INO) हा ‘न्यूट्रीनो’ या मूलकणांचा अभ्यास करणारा वैज्ञानिक महाप्रकल्प आहे. ‘न्यूट्रीनो’ हे सूर्य, तारे आणि वातावरणात निसर्गतः तयार होणारे मूलकण आहेत.

आम्ही कोण ?

सहकार्य

वीसहूनही अधिक संस्थांचे संघटन (collaboration)
आमच्या प्रकल्पाच्या संघटनेत (collaboration) देशातील वीसहूनही अधिक संस्थांमधील संशोधक आणि विद्यार्थी कार्यरत आहेत. मुंबईतील टाटा मुलभूत संशोधन संस्था (TIFR) व भाभा अणुसंशोधन केंद्र (BARC), चेन्नईतील गणितीय विज्ञान संस्था (IMSc), कोलकात्यातील परिवर्ती ऊर्जा सायक्लोट्रॉन केंद्र (VECC) व साहा नाभिकीय भौतिकी संस्था (SINP), तसेच काही भारतीय प्रौद्योगिकी संस्था (IITs) व विद्यापीठे देखील या प्रकल्पात महत्त्वाच्या भूमिका बजावीत आहेत.

यात सहभागी कसे व्हायचे ?

आमच्यात सामील होण्यासाठी

आमच्यात सामील होण्यासाठी
जर तुम्ही भौतिकशास्त्र विषय घेऊन पदव्युत्तर शिक्षण (MSc) पूर्ण केले असेल, अथवा इलेक्ट्रॉनिक्स, लेक्ट्रॉनिक्स -कम्युनिकेशन, इंस्ट्रुमेंटेशन आणि इलेक्ट्रिकल यापैकी कोणत्याही शाखेची अभियांत्रिकी वा तंत्रज्ञानाची पदवी (BE/ BTech) मिळवली असेल तर तुम्ही Ph.D. मिळविण्यासाठी आमच्या पदवीधर प्रशिक्षण कार्यक्रमात भाग घेऊ शकता. आमच्या कामाचे स्वरूप जाणून घेण्यासाठी जर तुम्हाला आमच्याबरोबर काही काळ छोटे प्रकल्प करायचे असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता.